आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

घोषणा -- तपशील वाचण्यासाठी क्लिक करा

Requirement for Web Mandal

24 October 2022

web mandal
Read more>>

नोंदणी / आजीव सदस्य

४ फेब्रुवारी २०२३

पानसे घराण्या च्या वंशावळीचे अद्ययावतीकरण
Read more>>

विविध वस्तू / सेवा सवलतीच्या दरात मिळवण्यासाठी प्रस्ताव

4 Feb 2023

Discounts on items / services for Life Members
Read more>>

अध्यक्षीय मनोगत - सुवर्ण महोत्सवी वर्ष - १९७३ - २०२३

 

 

 डॉ. जयंत दिगंबर पानसे, 

अध्यक्ष, पानसे मंडळ  (२०२२-२०२५)    

 

सप्रेम नमस्कार,

पानसे मंडळाच्या या नव्या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.  पानसे मंडळाचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष चालू झाले आहे  १९७३  साली  मार्च महिन्यात पानसे मंडळाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आणि १९९० साली पानसे  मंडळाची  शासनाकडे एक सार्वजनिक न्यास म्हणून नोंदणी झाली.  याच्या अगोदर सुद्धा १९४४ साली  पुण्यामध्ये काही पानसे मंडळी एकत्र आली होती व त्यांनी काही दिवस पानसे मंडळ चालवले सुद्धा.  त्या प्रयत्नांचा इतिहास याच संकेतस्थळावर तुम्हाला इतरत्र वाचायला मिळेल.

आज मीतीला पुणे, पानगाव, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर,  इंदूर, बेळगाव या ठिकाणी मुख्यतः पानसे मंडळी मोठ्या प्रमाणावर स्थायिक आहेत. याच बरोबर भारतातील आणि परदेशातील अनेक ठिकाणी पानसे मंडळी शिक्षणाच्या निमित्ताने, उदरनिर्वाहाच्या निमित्तांने किंवा पानसे घराण्यातील मुली विवाहानंतर, स्थायिक झाली आहेत. अशा अनेक ठिकाणी विखुरलेल्या पानसे मंडळींनी एकत्र येऊन पानसे घराण्यातील सर्वांची परस्पर उन्नती करावी हाच पानसे मंडळाचा मूळ उद्देश आहे आणि त्यासाठीच हे संकेतस्थळ.

ह्या संकेतस्थळाविषयी आपल्या प्रतिक्रिया आपण माझ्या ईमेलवर (dr.jayant.panse@gmail.com) कळवाव्यात म्हणजे या संकेत स्थळावर अजूनही काही सुधारणा करता येतील. तसेच संकेत स्थळावरील माहिती अथवा लेख ह्यासाठी  आपला सहभाग अपेक्षित आहे.  त्यासाठीसुद्धा आपण माझ्या  संपर्कात रहावे ही विनंती.

पुढच्या वर्षात आपल्या देशस्थ ब्राह्मण पानसे घराण्यातील प्रत्येकाशी संपर्क करून प्रत्येक व्यक्तीला पानसे मंडळात आजीव सदस्य करून घेण्याचा संकल्प आहे. याप्रमाणे पानसे मंडळाच्या कार्यासाठी,  विशेषतः  सर्वपोयोगी एक पानसे भवन  बांधण्यासाठी आपल्या सर्वांनी भरघोस  देणगी द्यावी अशी  मी आपल्याला विनंती करतो. यासंदर्भात आणि नवीन उपक्रमांसाठी सुद्धा आपण, कृपया कार्यवाह पानसे मंडळ यांच्याशी संपर्क साधावा

धन्यवाद

जाहिरात -- तपशील वाचण्यासाठी क्लिक करा