२. सरदार भिवराव पानसे पुण्यतिथी निमित्त सोनोरी येथे समाधी पूजन: पानसे घराण्यातील इतिहास प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे सरदार भिवराव पानसे. सरदार भीमरावांचे निधन फाल्गुन वद्य सप्तमी रोजी सोनोरी येथे झाले त्यांचेबरोबर त्यांच्या पत्नी सौभाग्यवती उमाबाई या सती गेल्या. या दोघांची ही समाधी सोनोरी येथे सरदार भीमरावांच्या वाड्याबाहेर आहे. फाल्गुन वद्य सप्तमी ही एखाद्या वर्षी सोमवार ते शनिवार या दिवशी आली तर द्यायचा धावपळीच्या जीवन पद्धतीस अनुसरून आपण त्याच्यानंतर येणाऱ्या रविवारी समाधी पूजनासाठी सोनोरी जाण्याची सोय केली आहेपानसे मंडळी सरदार भीमराव पानसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सोनोरी येथे मोठ्या संख्येने जातात बऱ्याच वेळेला अगदी दोन मोठ्या बसेस भरतील एवढी पानसे मंडळी सुद्धा सोनोरी येथे समाधी पूजना निमित्त येऊन गेली आहेत.
समाधी पूजनाच्या कार्यक्रमानंतर सोयीनुसार एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी दुपारच्या भोजनाचे आयोजन केले जाते. पानसे मंडळाचे एक माजी अध्यक्ष कै. श्री दिगंबर विश्वंभर पानसे उर्फ बाबासाहेब हे याप्रसंगी त्यांच्या सोनोरी येथील शेतावर अनेक वर्ष उपस्थित सर्व पानसे मंडळींना पुरणपोळीचे जेवण देत असत.
जेवणाच्या कार्यक्रमानंतर उपलब्ध वेळेनुसार जवळची प्रेक्षणीय ठिकाणे पाहण्यासाठी सहलीचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत आपण श्री क्षेत्र नारायणपूर, श्री खंडोबा रायाची जेजुरी, केतकावळ्याचा व्यंकटेश, भुलेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर, सांगवी सांडस येथील नदीकाठी असलेले मंदिर, इत्यादी ठिकाणी जाऊन आलो आहोत.
पानसे मंडळास सोनोरी येथील समाधी पूजन, नाष्टा व भोजन आणि नंतरची प्रेक्षणीय स्थळांची सहल यासाठीचा प्रवास यासाठी खूप खर्च येतो. परंतु यास सहलीमध्ये जे आजीव सदस्य असतात, त्यांच्या मोठ्या खर्चाचा भार पानसे मंडळ उचलते; तथापि समाधी पूजनाच्या कार्यक्रमाला व नंतरच्या सहलीला येणाऱ्या व्यक्तींपैकी कोणी व्यक्ती आजीव सदस्य नसेल तर त्या व्यक्तीला पानसे मंडळाने ठरवलेला वय निरपेक्ष पूर्ण आकार पडेल.
येथे नमूद करावेसे वाटते की पानसे मंडळाची आजीव सदस्य वर्गणी (म्हणजे आयुष्यात एकदाच भरावयाची) ही आज मीतीला प्रतिव्यक्ती फक्त रु.५०१ /- ( रु. पाचशे एक फक्त ) आहे.
सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात सोनोरी येथील समाधी पूजन आणि सहलीच्या कार्यक्रमाची कल्पना संक्रांतीच्या तिळगुळ समारंभातच कार्यवाह यांच्या कडून दिली जाते याशिवाय साधारणपणे समाधी पूजन व सहलीला जायच्या आधी तीन आठवडे आजीव सदस्यांना एस एम एस अथवा पोस्ट द्वारे सूचना दिली जाते. यामध्ये जायची तारीख कार्यक्रम आणि अजून सदस्यांना असलेली सवलत वर्गणी कुणाकडे देऊन नाव नोंदणी करायची याचा तपशील दिलेला असतो. तसेच ज्यांना कुणाला यानिमित्ताने आजीव सदस्य व्हायचे असेल तर त्याची प्रक्रिया पण दिलेली असते.