आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

थोडक्यात इतिहास

पानसे घराण्याचा संक्षिप्त इतिहास

स्वराज्याच्या उज्वल काळात पुष्कळ घराणी पुढे आली. त्यापैकी पानशांचे घराणे होय. पानसे घराण्यातील पंचवीस पिढ्यांचा इतिहास म्हणजे जवळपास सहाशे वर्षांचा इतिहास आपणाला वाचायला मिळतो. पानसे मुळचे कोठले? त्यांचा विस्तार कोठे कोठे कसा कसा होत गेला? त्यांच्या उपशाखा कशा होत गेल्या? यासह अनेक प्रश्न पडतात. १९२९ साली प्रकाशीत झालेल्या "पानशे घराण्याचा इतिहास" या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा होतो. १९२९ साली "पानसे घराण्याचा इतिहास" या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांचे संपादक होते कै. केशव रंगनाथ पानसे. त्यानंतर ह्या इतिहासाच्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती १९७८ साली प्रकाशित झाली. २०१३ पासून तिसऱ्या आवृत्तीचे काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होऊन "पानसे घराण्याचा इतिहास" तिसऱ्या आवृत्तीमध्ये प्रकाशित होईल. याचाच संक्षिप्त भाग खालीलप्रमाणे आहे. लवकरच ते पूर्ण होऊन "पानसे घराण्याचा इतिहास" तिसऱ्या आवृत्तीमध्ये प्रकाशित होईल. याचाच संक्षिप्त भाग खालीलप्रमाणे आहे. (खालील मजकुरासाठी प्रथम व द्वितीय आवृत्तीचा आधार घेतला आहे.)

पानसे यांचे मुळ आडनाव "पानसी" असून हे ॠग्वेदी, आश्वलायन देशस्थ ब्राह्मण होत. यांचे गोत्र मुद्दगल असून त्यांचे अंगिरस, भार्म्यश्व, व मौद्गवल्य असे तीन प्रवर आहेत. आश्वलायनने अंगिरसऎवजी तृक्ष याचे नांव दिले आहे. (काही अपवाद पानशांचे गोत्र वेगळे आहे. त्याचा इतिहास शोधण्याचे काम इतिहास संशोधक करत आहेत.) कागदपत्रावरून पानसे घराण्याची माहिती १५७८ पासून उपलब्ध झालेली आहे. यापुर्वीची माहिती काही दंतकथांच्या आधारे मिळाली आहे. पानसे हे मुळचे कर्नाटकतील रहिवासी होते. कर्नाटकातून पानशांचा मूळ पुरूष महाराष्ट्रात आले होते. त्याच्या मुलांची व नातवांची नावे अनुक्रमे एकावा, भुतावा आणि परसावा अशी होती. पानसे हे कर्नाटकातून महाराष्ट्रात कशामुळे आले? याचेदेखील दाखले मिळाले आहेत. साधारणतः १४६५ ते १४७५ (अंदाजे) या काळात तेथे दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता. हा दुष्काळ भयंकर होता. कर्नाटकापेक्षा महाराष्ट्रात याचा परिणाम थोडा कमीच होता. त्यामुळे ही कानडी घराणी महाराष्ट्रात येऊन राहिली. गोविंदपंत हे मूळपुरूष आहेत. गोविंदपंतांचे नातू भुतावा ह्याच्याकडे दुष्काळाच्या वेळी १८ गावांच्या पैकी काही गावाच्या वृत्ती खरेदी केल्या. भुतोपंत यांना दोन पुत्र होते. मेंगाजी व बाळाजी. मेंगाजी यांनी पानगांवचे देशपांडेपण व कसब्यांचे महाजनपण चालविले. पानगांव येथे पानश्यांच्या पुर्वीचे जे ब्राह्मण जातीने वतनदार देशपांडे घराणे त्यांचे आडनांव गिटी असे होते. बहामनी राजवटीत हे ब्राह्मण घराणे बाटले. गिरींकडून काही अपराध झाल्यामुळे बेदरच्या पातशहाने त्यांचे देशपांडेपण काढून मेंगाजी पानसे यांच्याकडे सुपूर्द केले. मेंगाजी यांना तीन पुत्र. भुतोपंत, सखोपंत व विठ्ठलपंत. गिरांकडून देशपांडेपण (बाटगे मुसलमान) गेल्यानंतर त्यांच्या घरामध्ये वैर माजले होते. मेंगाजी जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत गिरीकडूनचा सूड घेण्याचा डाव फसला होता. पण मेंगाजी गेले आणि गिरींनी पानसे घराण्यातील पुरूषांच्या खुनाचा सपाटा लावला. त्यामध्ये सर्व पुरूष मारले गेले. त्या भितीमुळे जिवंत राहिलेल्या पानश्येंच्या बायकांनी गाव सोडला. गिरीच्या खुनाच्या सपाट्यामध्ये फक्त एकच लहान मुलगा जिवंत राहिला होता. भुतोपंतांच्या घरी तिखांडे नावाची कुणबीण कामाला होती. तिने त्या लहान मुलाला घेऊन (भाकरीच्या टोपल्यात) पानगांव सोडला. ती थेट इंदापुरला पोहचली. तेथील कुलकर्ण्यांकडे (वाघ) यांच्याकडे ती भाकरीची टोपली (भुतोपंतांचे सुपुत्र परशुराम) सुपूर्त केली. ती तिखांडेबाई खरोखरच स्वामीभक्त होती. आज जो पानशांचा विस्तार झाला आहे (जो वंश वाढला आहे) तो फक्त त्या तिखांडे बाईंमुळेच! पुढे परशुराम हे (१५०८ साली) पुणे शिरवळ प्रांतात आल्याची नोंद आहे. परशुरामास भुतोपंत नावाचा मुलगा होता. भुतोपंतांना बाळावा, परसावा व तानाजी या नावाचे तीन पुत्र. या तीन पुत्रांचा वंशविस्तार पुणे प्रांतात होऊन त्यांनी व त्यांच्या वंशजांनी पुढे अनेक वृत्ती आणि इनामे मिळविली. परसांवा यांचा वंशविस्तार मोठा असल्याने व त्याने सोनोरी पानश्यांचे मुख्य गांव मिळवले. परसावा यांना लक्ष्मीधर नावांचा एकुलता एक मुलगा होता. त्या काळात मौजे दिवे व सोनोरीचे ज्योतिष व कुळणकर हे गिधवे यांच्याकडे होते. गिधवे यांना पुत्र नव्हता. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न श्री. लक्ष्मीधर यांच्याबरोबर केले. संसाराला कंटाळून ते काशीला गेले तेव्हा त्यांनी सोनोरी व दिवे येथील कुळणकर व ज्योतिष लक्ष्मीधरला इनाम स्वरूपात दिले. असे अनेक इतिहासाचे पैलू आपणाला "पानसे घराण्याचा इतिहास" दुसऱ्या आवृत्तीच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये वाचण्यास मिळतील.