आमच्या वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

    भाषा निवडा
हे अधिकृत संकेतस्थळ पानसे आडनावाच्या हिंदू देशस्थ ब्राह्मण पुरुष/महिलांचे जगभर प्रतिनिधित्व करणाऱ्या पानसे मंडळ चॅरिटेबल ट्रस्टचे आहे.
येथे नोंदणी करा आजीव सदस्य बनू लॉगिन करा
माहिती पाहण्यासाठी खाली क्रोल करा.
Bootstrap Touch Slider

पृष्टभाग पानसे मंडळाबद्दल पानसे विश्व
ब्लॉग पानसे माहेरवाशणी गट (PMW) युवा पानसे गट (YPG) आमच्याशी संपर्क साधा

सदस्य बनू

पानसे मंडळाला देणगी देण्याची विनंती

१९७३ साली  पानसे मंडळ स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत, अनेक देणगीदारांनी उदार हस्ते देणगी दिल्यामुळे पानसे मंडळ कार्यरत आहे. १९९५ च्या सुमाराला कै. वसंत विठ्ठल पानसे यांनी देणगी आणि बिनव्याजी मुदत ठेव मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे, तोपर्यंत साठवलेल्या इतर निधीला  हातभार लागला व त्यावेळेचे कार्याध्यक्ष  श्री  कोंडदेव सावळाराम पानसे यांनी प्रचंड धडपड करून नारायण पेठेमध्ये पानसे भवनासाठी स्थावर मालमत्ता विकत घेतली. ही मालमत्ता आपण वेळोवेळी भाड्याने देऊन त्याच्या भाड्यापोटी येणाऱ्या रकमेचे मुदत ठेवीत रूपांतर करून त्याच्या  वार्षिक व्याजामध्ये पानसे मंडळाचा कारभार चालवला  आहे.

आज २०२२ साली म्हणजे जवळ जवळ २५ वर्षानंतर, नारायण पेठ, पुणे, येथील पानसे भवनाची इमारत जुनी झाली आहे व त्याला वारंवार डागडुजी करायला लागते.  त्यामुळे ही स्थावर मालमत्ता योग्य किमतीला विकून एखाद्या दुसऱ्या ठिकाणी नवीन सुखसोयी युक्त अशी पानसे भवनाची स्थावर मालमत्ता खरेदी करावी  असा ठराव तीन-चार वर्षांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उपसूचननेसह संमत झाला. उपसूचना अशी होती ही की, प्रथम नवीन मालमत्ता शोधावी आणि नंतरच सध्याच्या मालमत्तेचा विक्री व्यवहार करावा. त्या निमित्ताने शोध घेतला असता, जुन्या मालमत्तेची विक्री किंमत आणि नवीन मालमत्तेची खरेदी किंमत याच्यामध्ये खूप  तफावत आहे असे दृष्टीस आले. याला उपाय एकच. तफावतीचा रकमेएवढी रक्कम देणगी म्हणून मिळवावी.

पानसे मंडळाला पन्नास वर्ष होण्याच्या निमित्ताने सर्व पानसे मंडळींना असे आवाहन आहे की त्यांनी नवीन पानसे   भवन उभारण्यासाठी उदार हस्ते देणगी द्यावी. त्यांना अशी कळकळीची विनंती आहे.

पानसे मंडळाला आर्थिक मदत आपण खालील निधींमध्ये भर घालून करू शकता:

१. पानसे भवन निधी:   वर उल्लेखलेल्याप्रमाणे  नवीन सुखसोयी युक्त पानसे भवन विकत घेण्यासाठी निधीची नितांत आवश्यकता आहे.  आपण एक रकमी किंवा दरवर्षी थोडी थोडी अशी आर्थिक मदत आपल्या आई-वडिलांच्या किंवा दिवंगत नातेवाईकांच्या स्मरणार्थ करू शकता..

२.  गुणवंत विद्यार्थी पारितोषिक निधी:  इतरत्र लिहिल्याप्रमाणे  पानसे मंडळाने १९८८  साली  तत्कालीन कार्यवाह कै. वसंत कृष्ण पानसे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्याचे ठरवले.  तेव्हापासून आजतागायत सुमारे ३४ वर्षे पानसे मंडळ  आपल्या घराण्यातील  तसेच आपल्या विवाहित मुलींच्या  गुणवंत मुलांना  विद्यार्थ्यांना सातत्याने गौरवत आहे. 

आपण सध्या फक्त वार्षिक पारितोषिक एच गुणवंत विद्यार्थ्यांना देत आहोत परंतु आपल्या घरातील मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती द्यायची फार इच्छा आहे परंतु निधीअभावी आपण अशी शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊ शकत नाही तेव्हा आपल्या सर्वांना आवाहन असे की आपण मुक्तहस्ताने गुणवंत पारितोषीक निधीसाठी देणगी द्यावी.

३. सामान्य देणगी  या दोन विशेष  निधींच्या  व्यतिरिक्त आणखी इतर  कुठल्या कारणासाठी आपणास देणगी द्यावयाची असेल   तरीआपण देऊ शकता.  त्यासाठी आपण पानसे मंडळाच्या कार्यवाह   यांच्याशी ताबडतोब संपर्क  साधा.  

आपली देणगी आपण पानसे मंडळ यांच्या खालील बँक खात्यामध्ये ऑनलाइन पाठवू शकता त्याचा तपशील  खालील प्रमाणे.  आपण रक्कम पाठवल्यानंतर त्याचा संदर्भ देऊन देणगी कशासाठी पाठवली याचा उल्लेख करणारी ई-मेल  कार्यवाह यांना पाठवावी म्हणजे ते आपल्याला यथावकाश पोहोच पावती पाठवतील

Details of the Bank for remitting “Life Membership” fee & Other donetions:
Account Name: Panse Mandal
Bank: Cosmos Co-operative Bank Ltd., Laxmi Road Branch, Pune 411030. INDIA
Account No.: 010204201038266
IFSC Code: COSB0000010