१४९६ पासून सुरू ज्ञात पानसे घराण्याच्या स्थलांतराचा आणि काळानुरूप अनेक वळणे घेतलेला गरजेप्रमाणे विजयनगर पासून सुरू झालेला प्रवास काही ठिकाणी थांबला. काही पानसे त्या ठिकाणी स्थायिक झाले तर काही पुढं निघाले; हे अगदी साधरण पानिपतच्या युद्धापर्यंत चालू होते. त्यात्या ठिकाणी स्थायिक झालेली मंडळींनी त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी विविध व्यवसाय नोकरी इत्यादी केले. विदर्भातले म्हणजे नागपूरचे पानसे हे देशस्थ यजुर्वेदी शाखेचे आहेत त्यांचा पूर्ण शोध लागत नाही. पण पानसे घराण्यातील इतिहासकार इंजिनीयर केशव रंगनाथ पानसे यांनी त्यांची माहिती मिळवली आणि १९२८ साली प्रसिध्द केलेल्या पानसे घराण्याच्या पहिल्या आवृतीत त्यांचा समावेश केला आहे. त्याप्रमाणे विदर्भातील / मराठवाड्यातील एक दोन ठिकाणी पानसे मंडळी मोठ्या संख्येने राहात होती किंवा आहेत असे कळते.
अशा काही ठिकाणांची ओळख मूळ गावे या सदरात आपण करून घेत आहोत
पानसे यांची माहिती असलेली मूळ गावे
१. पानगाव जिल्हा सोलापूर
२. वाठार जिल्हा सातारा
३. पसरणी जिल्हा सातारा
४. लोणी भोळी जिल्हा सातारा
५. सोनोरी जिल्हा पुणे
६. दिवे जिल्हा पुणे
७. वरुड बगाजी जिल्हा अमरावती
८. माजलगाव जिल्हा बीड
पानिपतच्या युद्धाच्या वेळी सरदार पानसे यांच्याकडे तोफखान्याची जबाबदारी होती त्यामुळे सदाशिवरावभाऊ पेशवे व विश्वासराव पेशवे यांचे बरोबर पानसे घराण्यातील अनेक मंडळी पानिपतच्या मोहिमेवर गेली. त्यातील काही जाताना किंवा येताना इंदूर तसेच बेतुल अशा मध्य प्रदेश मधील गावी स्थायिक झाली आहेत.
आपल्या मूळ गावांची ही थोडीशी ओळख