१९२४ साली पेन्शन घेतल्यावर असिस्टंट इंजिनीयर केशव रंगनाथ पानसे यांनी पुढची चार वर्षे अथक परिश्रम करून,जुनी दप्तरे,वंशावळी आणि ऐवज एकत्र करून पानसे घराण्याचा सुमारे ५०० वर्षाचा इतिहास लिहिला . गं .भां .सीताबाई सावळाराम पानसे व श्री गहिनीनाथ माधवराव पानसे यांनी ह्या कामी उदार मनाने अर्थसह्याय केले म्हणून हा इतिहास प्रसिद्ध होऊ शकला.
१९७३साली केशव रंगनाथ यांचे सुपुत्र श्री .सदाशिव केशव आयकर खात्यातून निवृत्त झाले आणि वडिलांसारखेच पानसे मंडळीचे प्रेम असल्यामुळे पानसे मंडळाच्या इतिहासाची नवीन उपलब्ध झालेल्या माहितीसह द्वितीय आवृत्ती काढावी अशी त्यांना इच्छा झाली. गं.भा.सीताबाई सावळाराम पानसे यांचे सुपुत्र श्री कोंडदेव सावळाराम यांनी पुढाकार घेऊन ( ते मुख्याधापक असलेल्या रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळेत) पहिली सभा घेतली या सभेत काही मोजकीच पानसे मंडळी उपस्थीत होती .१९२८सालच्या पानसे घराण्याच्या इतिहासाला महामहोषाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांनी पुरस्कार लिहिला होता त्यात त्यांनी म्हटले आहे सर्व पानसे मंडळीनी एकत्र]येउन कुल संमेलन संस्था सहकारी तत्त्वावर काढून लवकरात लवकर कायम करावी जेणे करून पानसे मंडळीची हर प्रकारे उन्नती होईल .१९७३ च्या रस्ता पेठ हायस्कूल मधील प्रथम सभा ही आद्य पानसे मंडळाची नांदीच ठरली . श्री.मनोहर भास्कर, कोंडदेव सावळाराम, सदाशिव केशव, डॉ.केशव विष्णु, दिगंबर विष्णु, दिगंबर विनायक, भीमाशंकर विश्वनाथ, वसंत कृष्ण. अशी पानश्यांच्या अनेक मूळ गावातील आणि उदरनिर्वाहासाठी पुण्यात स्थायिक झालेली समवयस्क व समविचारी पानसे मंडळी एकत्र आली. त्यावेळेचे उदिष्ट होते पानसे घराण्याच्या इतिहासाची द्वितीयावृत्ती.ही सर्वांच्या परिश्रमाने १९७८ साली प्रसिद्ध झाली. त्या निमित्ताने पुण्यातील पानसे मंडळी वेळो-वेळी भेटत गेली .परंतु मुख्य अडचण होती ती पैश्याची. त्या वेळी जवळ जवळ सर्वच पानसे मंडळी कनिष्ट मध्यमवर्गातील. त्यामुळं कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं की ,प्रथम पैश्याची तोंड मिळवणी करायची.
त्यावेळी एक खंदे पुरस्कर्ते आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभले ते म्हणजे गोविंद भास्कर उर्फ नानासाहेब ,सर्व सामान्य सामाजाच्या दृष्टीने पानसे वकील.अतिशय तल्लख बुद्धिमत्ता व निर्भीड वृत्ती ह्यामुळे नानासाहेबाच्या बरोबर काम करायला पानसे मंडळीला एक वेगळाच उत्साह असायचा .जड झालेल्या खर्चासाठी त्यांचे आर्थिक पाठबळ पण असायचे. १९७३ ते १९८९ जवळ जवळ १६ वर्षें पानसे मंडळ ही फक्त वर्षातून २-४ वेळा एकत्र येण्याचे'पानसे मंडळीचे व्यासपीठ होते.कोंडदेव सावळाराम हे १९९० मध्ये कार्यवाह असताना त्यांनी पानसे मंडळाची घटना करवून घेतली आणि तसेच पानसे मंडळ धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत करून घेतले. गेल्या पिढीमधील पानसे मंडळीत करून घेतले .गेल्या पिढीमधील पानसे मंडळीत शिक्षण क्षेत्रातील बरीच मंडळी होती .त्यापैके एक म्हणजे वसंत कृष्ण .हे भारत इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक होते .