३. वार्षिक स्नेहसंमेलन: सामान्यतः मे- जून महिन्यामध्ये सर्वत्र सुट्टीचे वातावरण असते. या महिन्यातल्या एखाद्या सोयीच्या रविवारी पानसे मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी भरवले जाते. हा चार पाच तासांचा. भरगच्च कार्यक्रम असतो. पानसे मंडळींपैकी इच्छुक आणि गुणी आबालवृद्धांचे विविध गुणदर्शन / विविध खेळ, याशिवाय एखाद्या व्यावसायिक कलाकाराचे कला प्रदर्शन अथवा विद्वानाचे उचित विषयासंबंधी भाषण आणि त्यानंतर पोटभर भोजनाचा कार्यक्रम असे या स्नेहसंमेलनाचे स्वरूप असते.
वार्षिक स्नेहसंमेलना च्या कार्यक्रमाला सुद्धा पानसे मंडळ भरपूर खर्च करते त्यापैकी अतिशय कमी अशा रकमेची प्रतिव्यक्ती वर्गणी या कार्यक्रमाला उपस्थित राहताना भरायचे असते. ही वर्गणी किती आहे हे कार्यवाह वेळोवेळी जाहीर करतात.
वार्षिक स्नेह संमेलनाची रूपरेषा सामान्यतः कार्यकारिणीच्या मार्च किंवा एप्रिल महिन्याच्या मासिक बैठकीत ठरते; त्यानंतर कार्यवाह स्नेह संमेलनाचे ठिकाण ठरवून तसेच इतर कार्यकारिणी सभासदांच्या मदतीने मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवतात. त्यानंतर प्रत्यक्ष स्नेहसंमेलनाच्या दिनांक पूर्वी तीन आठवडे आजीव सदस्यांना एस एम एस आणि पोस्टाने सूचना पाठवतात.